🎯 8 जुलै चालू घडामोडी व स्पष्टीकरण 🎯
Q. 1) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2022 च्या क्रमवारीत कोणते राज्य अव्वल आहे?
• ओडिशा
स्पर्धात्मक मुद्दे –
– हा कायदा केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केला आहे.
– दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आंध्रप्रदेश हे राज्य आहे.
Q. 2) ग्रीनकोने शाश्वत विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी भारतातील पहिली समर्पित शाळा सुरू करण्यासाठी कोणत्या IIT सोबत सामंजस्य करार केला आहे?
IIT हैदराबाद
Greenko
स्पर्धात्मक मुद्दे –
– शाश्वत विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणारी ही देशातील पहिली संस्था असेल.
– या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. • जून 2023 पर्यंत, एमटेक आणि पीएच.डी.साठी विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचला प्रवेश दिला जाईल.
Q.3) तरुण मजुमदार” यांचे नुकतेच निधन झले आहे, ते प्रसिद्ध होते?
– चित्रपट निर्माते
स्पर्धात्मक मुद्दे –
– मजुमदार यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
– तरुण मजुमदार हे 1990 मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराचे मानकरी होते. ते चार राष्ट्रीय पुरस्कार, 7 BFJA पुरस्कार, 5 फिल्मफेअर पुरस्कार आणि एक आनंदलोक पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत.
Q. 4) CBSE बोर्डाने सुरू केलेल्या सर्व CBSE परीक्षा उपक्रमांसाठी वन-स्टॉप पोर्टलचे नाव काय आहे?
✅️ परिक्षा संगम
स्पर्धात्मक मुद्दे –
– CBSE बोर्डाने बोर्ड परीक्षा निकाल, नमुना पेपर आणि इतर तपशील एकाच विंडोमध्ये सुव्यवस्थित करण्यासाठी ‘परीक्षा संगम’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे.
– cbsedigitaleducation.com नुसार, नव्याने लाँच झालेले परिक्षा संगम पोर्टल “शाळेच्या प्रादेशिक कार्यालये आणि CBSE बोर्डाच्या मुख्यालयाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध परीक्षा-संबंधित प्रक्रियांना एकत्रित करेल”.
Q. 5 ) अलीकडेच कोणत्या संस्थेने स्वायत्त विमानाच्या मेडेन टेक-ऑफची यशस्वी चाचणी घेतली आहे?
– DRDO
स्पर्धात्मक मुद्दे –
– DRDO full form : Defence Research & Development
Organisation.
– DRDO ची स्थापना: 1 जानेवारी 1958
– DRDO मुख्यालय: नवी दिल्ली
– DRDO चे अध्यक्ष: जी. सतीश रेड्डी;
– DRDO चे ब्रीदवाक्य: शक्तीचे मूळ ज्ञानात आहे
Q.6) दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा केला जातो?
– 6 जुलै
WORLD ZOONOSES DAY
स्पर्धात्मक मुद्दे –
– इन्फ्लूएंझा, इबोला आणि वेस्ट नाईल विषाणू यांसारख्या प्राणिप्रसारित रोगाविरूद्ध प्रशासित केलेल्या पहिल्या लसीकरणाच्या स्मरणार्थ दरवर्षी 6 जुलै रोजी जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा केला जातो.