गडचिरोली पोलीस भरती जाहीरात
- आज रोजी गडचिरोली जिल्ह्यासाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- एकूण 136 पदाकरिता ही भरती घेण्यात येणार आहे.
- फॉर्म भरण्याची date – 21.05.2022 ते 05.06.2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.
अर्ज करावयाची पद्धत.. ऑफलाईन
- आवेदन अर्ज उपलब्ध होणाचे व स्विकारण्याचे ठिकाण..केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे अर्ज मिळतील तसेच पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे संकेतस्थळावर (www.gadchirolipolice.gov.in व www.mahapolice.gov.in) आवेदन अर्ज डाउनलोड करता येईल.
●आवेदन अर्ज दिनांक २१/०५/२०२२ पासून उपलब्ध होतील. तसेच दिनांक ०५/०६/२०२२ चे १८.०० वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलोस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय,गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे आवश्यक फी भरून स्विकारण्यात येतील.
वयोमर्यादा
- ओपन -28
- कास्ट – 33
अधिक माहिती साठी खाली जाहिरात PDF दिलेली आहे त्याला क्लिक करून डाउनलोड करा.
गडचिरोली पोलीस भरती 2022- इथे क्लिक करून PDF डाउनलोड करा
काही विशेष बाबी…
- ही भरती फक्त गडचिरोली मध्ये राहणाऱ्या उमेदवारांसाठीच आहे. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेल्या वास्तव्याचा दाखला ( residential certificate) सादर करणे आवश्यक राहील.
- प्रथम लेखी परीक्षा होणार.
- NCC उमेदवारांना यामध्ये आरक्षण दिलेला आहे.
- NCC क प्रमाणपत्र – 5%गुण
- NCC ब प्रमाणपत्र तीन टक्के गुण
- NCC अ प्रमाणपत्र दोन टक्के गुण. मिळणार.
अर्ज करावयाची पद्धत…
अर्ज करायची पध्दत :
आवेदन अर्ज सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोमके पोलीस मुख्यालय, गडचिरोली, पोलीस उपमुख्यालय प्राणहिता ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून त्या ठिकाणी स्विकारले जातील व शुल्क रोखीने भरुण त्याबाबतची पावती देण्यात येईल.
२. आवेदन अर्जावर उमेदवाराने स्वतःचा अद्यावत (Latest) फोटो असावा
३. (टिप:- उमेदवाराने आवेदन अर्जावर जोडावयाचा फोटो हा डोक्यावर कोणत्याही प्रकारची टोपी न घालता काढलेला असावा. कोणत्याही प्रकारची टोपी न घालता व चेहरेपट्टी स्पष्ट ओळखता येईल असा असावा. प्रवेशपत्रावर / अर्जावर दुसऱ्याचा फोटो / सही असल्यास सदर उमेदवारास भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.) आवेदन अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या फोटाच्या प्रती भरती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यापर्यंत सादर करणे अनिवार्य राहील. यासाठी अर्जदाराने कमीत कमी १० फोटोच्या प्रती स्वत:कडे ठेवणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षा
लेखी परिक्षा :अ) पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम लेखी परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. लेखी परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमुद केलेल्या दिनांकास परिक्षा सुरु होण्यापुर्वी परिक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थीत राहावे लागेल. सदरहु लेखी परिक्षा होण्यासाठी खुल्या प्रवगातील उमेदवारांस ३५ टक्के व मागासप्रवर्गातील उमेदवारास ३३ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम
जास्तीत जास्त गोंडी भाषेचा अभ्यास यावर जास्त भर द्यावा