😍😍 टेस्ट game no. 2 – टॉपिक- विशेषण May 8, 2022 by Laksh Career Academy Solapur या टेस्ट चा टॉपिक हा विशेषण आहे. Telegram Rule तुम्हाला माहिती असेल या game चा जिथे चुकला तिथे तुम्ही out 😯. विचार करून उत्तरे द्या. प्रामाणिकपणे खेळा नक्की यामुळे ट्रिपल बेनिफिट होईल. /10 0 Created on May 08, 2022 By Tile 😍😍 टेस्ट game no. 2 😍😍 टेस्ट rule एकूण 10 प्रश्न असतील. ️ जिथे प्रश्न चुकला तिथेच तुम्ही बाद होणार. ️ म्हणजे एक चूक game मधून बाहेर. ️ रोज एक टॉपिक वर अशी मजेदार टेस्ट राहील. ️ यामुळे तुम्हाला टॉपिक चा अभ्यास तगडा होईल. अभ्यासात देखील खूप मदत मिळेल. 1 / 10 1) "आंबट बोरे"मधील विशेषणाचा प्रकार कोणता ? 1) संख्या विशेषण 2) सार्वनामिक विशेषण 3) गुण विशेषण 4) यापैकी नाही 2 / 10 2) रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे ? 1) हे पृथकत्ववाचक संख्याविशेषण आहे. 2) हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे. 3) हे गणनावाचक संख्याविशेषण आहे. 4) यापैकी नाही अनिश्चित संख्या विशेषण 3 / 10 3) काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता ? 1) सिद्ध विशेषण 2) गुण विशेषण 3) क्रमवाचक विशेषण 4) साधित विशेषन 4 / 10 4) बोलका पोपट उडून गेला. या वाक्यरचनेतील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्याचे सांगता येईल? 1) यापैकी नाही 2) गुणविशेषण 3) अनिश्चयवाचक 4) धातुसाधित विशेषण 5 / 10 5) चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणचा प्रकार ओळखा. 1) अधिविशेषण 2) साधित विशेषण 3) विधी विशेषण 4) अनिश्चित विशेषण 6 / 10 6) खालीलपैकी विशेषण ओळखा.? 1) कृती 2) कट्टा 3) कबाड 4) कट्टर 7 / 10 7) "एक एक जण या" यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? 1) संख्यावाचक 2) पृथकत्ववाचक 3) गुणवाचक 4) क्रमवाचक 8 / 10 8) 'शिपाई शूर होता' या वाक्यातील शूर हा शब्द____आहे. 1) विशेषण 2) सर्वनाम 3) नाम 4) क्रियापद 9 / 10 9) विशेषण या शब्दजातीमध्ये...(पूर्ण निट वाचा ) अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात.. ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो. क) सर्व विशेषणे विकारी असतात. वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? 1) फक्त अ बरोबर 2) अ, ब आणि 3) अ आणि क 4) अ, ब आणि क तिन्ही बरोबर 10 / 10 10) पुढील वाक्यातील 'वाहती' या शब्दाचा प्रकार सांगा. 'अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? 1) धातुसाधित विशेषण 2) अधी विशेषण 3) नामसाधित विशेषण 4) संख्याविशेषण Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp