पोलीस भरती परीक्षेचे टप्पे

पोलीस भरतीसाठी दोन परीक्षा असतात.
1) लेखी परीक्षा
लेखी परीक्षा ही 100 गुणांची असते. त्यामध्ये एकूण चार विषय असतात. जसे की मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान.

✅️ लेखी परीक्षेसाठी 90 मिनिटे असतात.
✅️ सर्व प्रश्न बहुपर्यायी व वास्तुनिष्ठ असतात. म्हणजे इथे
लिखाणाचं काम नसतं.
✅️ प्रश्नांचा दर्जा हा बारावी दर्जाप्रमाणे असतो.

दुसरा टप्पा.

2) मैदानी चाचणी

👉 मैदानी चाचणी ही 50 गुणांची असते.

टीप – 2019 चा भरती मध्ये 3 इव्हेंट होते.
1) 100 मीटर – 10 गुण
2) गोळा फेक – 10 गुण
3) 1600/800- 30 गुण

परंतु आता येणाऱ्या भरतीमध्ये 5 इवेंट असण्याची शक्यता आहे. परंतु या बाबतचा अद्याप कोणताही जीआर प्रसिद्ध झाला नाही. त्यामुळे उमेदवारांनी या वेळेस सुद्धा 3 इव्हेंट आहेत असे समजावे.

टीप – जोपर्यंत नवीन जीआर येत नसतो तोपर्यंत जुना जीआर हा कायम असतो.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!