स्पेशल टेस्ट no.460 November 15, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.460 TelegramAll the best 👍♥️आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे ,जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवू शकते...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25' भाषा ' हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे ? वाक् भाष् वर्ण स्वर 2 / 25खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते ? नीरस मनोरंजन दुर्जन निस्तेज 3 / 25खालीलपैकी सामान्य नाम कोणते ? आग्यावेताळ अरवली दांडगाई आमराई 4 / 25नामाचा प्रकार ओळखा . ' प्रामाणिकपणा ' सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम व्यक्तिवाचक नाम 5 / 25नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ? पर्यायी नाम उपनाम सर्वनाम क्रियापद 6 / 25स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. सर्व नामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम 7 / 25कार्तिकीने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. या वाक्यातील विशेषण कोणते ? सुरेल गाणी कार्तिकी मने 8 / 25खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ? पुस्तक सुंदर पोसणे लवकर 9 / 25वर , खाली , मागे , पुढे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ? विशेषण उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण 10 / 25दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' जोगा ' करणवाचक योग्यता वाचक संग्रहवाचक विरोध वाचक 11 / 25' हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. कारण बोधक स्वरूप बोधक संकेत बोधक उद्देश बोधक 12 / 25खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे. गवळी शिक्षिका इंजिनीयर कुंभार 13 / 25खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा. भाषा दिशा सभा वेळ 14 / 25' आता पाऊस थांबावा.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ 15 / 25' सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते.' कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे. स्त्रीचे मोत्यांमुळे अधिकच खुलते 16 / 25राम आंबा खातो. हे वाक्य.......आहे. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही 17 / 25पुढील शब्दातील मूळ समासिक शब्द कोणता ते ओळखा. दारोदारी सुयशी प्रत्येक साली प्रतीक्षण 18 / 25खालील पैकी शुद्ध / अचूक शब्द ओळखा. पुलिस पोलीस पोलिस पुलीस 19 / 25' आकाशात ढग जमतात , तेव्हा मोर नाचु लागतो ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 20 / 25' भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.' या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा. कामगिरी भारतीय क्रिकेट संघातील चांगली खेळाडूंनी 21 / 25समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ' भानू ' सविता आदित्य मित्र हेम 22 / 25खालीलपैकी विरुद्ध शब्दाची जोडी ओळखा. देव - दानव सबल - दुर्बल खेद - हर्ष घर - सदन 23 / 25बैलाच्या मानेवरचा उंचवडा. ( शब्द समूहाबद्दल एक शब्द ) बाशिंड बाशिंग आयाळ वशिंड 24 / 25' खापर फोडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ - खूप मार देणे विश्वासघात करणे दोष देणे हक्क सोडणे 25 / 25' शिकविलेली बुद्धी आणि....... फार काळ टिकत नाही. बांधलेली शिदोरी बांधलेली दोरी बांधलेले जोडे बांधलेले मांजर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp