🔰 तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 🔰
चालू घडामोडी घटकावरील प्रश्नांची उत्तरे
1. मायग्रेशन ट्रैकिंग सिस्टम (MTS) ऍप्लिकेशन विकसित करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
(1) बिहार
(2) गुजरात
(3) महाराष्ट्र
(4) उत्तर प्रदेश
उत्तर: (3) महाराष्ट्र
2. द्रौपदी मुर्मू, भारताच्या 15 व्या राष्ट्रपतीबाबत पुढील दोन विधाने पहा :
(a) त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.
(b) त्या कला शाखेतील पदवीधारक आहेत.
पर्यायी उत्तरे :
(1) केवळ (a) बरोबर
(2) केवळ (b) बरोबर
(3) (a) व (b) दोन्ही विधाने बरोबर
(4) (a) व (b) दोन्ही विधाने चूक
उत्तर: (3) (a) व (b) दोन्ही विधाने बरोबर
स्पष्टीकरण:
1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली. 2015 ते 2021 या काळात त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
3. इ.स. 2021 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले?
(1) अब्दुलरझाक गुरनाह
(2) डेव्हिड कार्ड आणि जोशुआ अँगरिष्ट
(3) मारिया रेसा आणि दिमीत्री मुराटोव्ह
(4) डोनाल्ड ट्रम्प
उत्तर: (3) मारिया रेसा आणि दिमीत्री मुराटोव्ह
4. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) ब्राझीलचा ‘ॲमेझोनिया-1’ उपग्रह अवकाशात केव्हा सोडला ?
(1) 12 ऑगस्ट 2021
(2) 19 एप्रिल 2021
(3) 28 फेब्रुवारी 2021
(4) 21 फेब्रुवारी 2021
उत्तर: (3) 28 फेब्रुवारी 2021
5. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो ?
(1) 1 डिसेंबर
(2) 4 डिसेंबर
(3) 5 डिसेंबर
(4) 10 डिसेंबर
उत्तर: (3) 5 डिसेंबर
6. नवी दिल्ली येथे (जून 2022) मध्ये ‘इंडस्ट्रियल डीकार्बोनायझेशन समीट 2022’ चे उद्घाटन कोणी केले ?
(1) परराष्ट्र मंत्री
(2) अर्थमंत्री
(3) रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री
(4) गृहमंत्री
उत्तर: (3) रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री
7. ऑगस्ट 2022 पर्यंत, भारतातील किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे ?
(1) 04
(2) 06
(3) 08
(4) 10
उत्तर: (2) 06
स्पष्टीकरण –
भारत सरकारने आत्तापर्यंत 06 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया. मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली.
8. 2022 चा साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा बालसाहित्य पुरस्कार मराठीसाठी संगीता बर्वे यांच्या कुठल्या कादंबरीला देण्यात आला?
(1) रानफुले
(2) गंमत झाली भारी
(3) उजेडाचा गाव
(4) पियुची वही
उत्तर: (4) पियुची वही
9. मंकीपॉक्सचा पहिला मानवी रुग्ण कधी आणि कोणत्या देशात नोंदवला गेला ?
(1) अंगोला – 2022
(2) इथिओपीया 2021
(3) नामिबीया 2022
(4) कांगो लोकशाही प्रजासत्ताक 1970
उत्तर – (4) कांगो लोकशाही प्रजासत्ताक 1970
10. नुकतेच जून 2022 मध्ये गोव्यात नॅशनल म्युझियम ऑफ कस्टम्स अँड जीएसटीचे उद्घाटन कोणी केले?
(1) प्रमोद सावंत
(2) एस. श्रीधरन पिल्लई
(3) पंतप्रधान नरेंद्र मोदी
(4) निर्मला सितारामन
उत्तर: (4) निर्मला सितारामन