चालू घडामोडी 21 may 2022

Imp चालू घडामोडी 21 मे 2022


Q.1 अलीकडेच कोणत्या राज्यसरकारने सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘लोक मिलनी’ योजना सुरू केली?

✅️ पंजाब

स्पष्टीकरण

– पंजाबचे मुख्यमंत्री : भगवंत मान

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित

राजधानी : चंदिगड


Q. 2) कान्स चित्रपट महोत्सवात कोणाला मानद पाल्मे डी ओरने सन्मानित करण्यात आले आहे?

✅️ टॉम क्रूझ आणि फॉरेस्ट व्हीटेकर

हा ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव आहे

– हा कान्स चित्रपटात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.


Q. 3) वेस्ली मॉर्गन यांना कोणत्या पुस्तकासाठी विल्यम ई. कोल्बी पुरस्कार मिळाला?

✅️ ‘द हार्डस्ट प्लेस’

 स्पष्टीकरण – नॉर्थफिल्ड, व्हरमाँट येथील नॉर्विच विद्यापीठाद्वारे कोल्बी पुरस्कार प्रदान केला जातो. कोल्बी पुरस्काराची स्थापना 1999 मध्ये झाली.


Q. 4) निखत जरीनने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?

✅️ सुवर्णपदक

स्पष्टीकरण – जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा केसी यांच्यानंतर निखत ही केवळ पाचवी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. – २५ वर्षीय जरीन ही माजी ज्युनियर युथ वर्ल्ड चॅम्पियन आहे.


Q. 5) जागतिक मधमाशी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

✅️ 20 मे

 स्पष्टीकरण – जागतिक मधमाशी दिन हा पर्यावरणातील मधमाश्या आणि इतर परागकणांची भूमिका ओळखण्यासाठी आहे

2022 ची थीम Bee Engaged: Celebrating the

diversity of bees and beekeeping systems


Q. 6) जागतिक बँकेने कोणत्या राज्याला SRESTHA G प्रकल्पासाठी USD 350 दशलक्ष मंजूर केले?

गुजरात

✅️ स्पष्टीकरण – जागतिक बँकेची स्थापना- 1944 मुख्यालय: वाशिंग्टन


Q.7) अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीला इंग्लंडच्या राणीने “मानद कमांडर ऑफद ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर” या संम्मानाने सम्मानित केले आहे?

✅️ अजय पिरामल

✅️ स्पष्टीकरण  – हा पुरस्कार 1917 मध्ये किंग जॉर्ज पंचम यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला आहे.


Q.8) “इटालियन टेनिस ओपन २०२२” चा पुरुष एकेरी कोणी जिंकले आहे?

✅️ नोव्हाक जोकोविच

 स्पष्टीकरण  – नोव्हाक जोकोविच हा खेळाडू सर्बिया या देशाचा आहे. स्टेफानोस सीतसीपासचा पराभव करत नोव्हाकने कारकीर्दीतील आपला 1001 वा विजय मिळवला.


Q.9) भारतातील नुकतेच घोषणा केलेले 52वे व्याघ्रप्रकल्प कोणते?

✅️ – रामगड विषधारी अभयारण्य भारतातील 52 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले

 स्पष्टीकरण –

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, 16 मे 2022 रोजी राजस्थानमधील रामगढ विषधारी अभयारण्य भारतातील 52 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले.

रणथंबोर, सरिस्का आणि मुकुंद्रानंतर हे राजस्थानमधील चौथे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे..


रोजच्या रोज चालू घडामोडी देत असतो ते मनापासून सर्वांनी लिहून ठेवत जा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!