आज जवळपास सर्व न्यूज चैनल वर पोलीस भरती बाबत न्यूज पाहिली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नांचा काहूर निर्माण झाला…
प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला असेल की भरती होईल की नाही? आणि झाली तर सुरुवातीला काय होईल? भरती मध्ये किती इव्हेंट असतील? पावसाळ्यात भरती शक्य आहे का?
प्रत्येक जण बोलत आहे भरती पावसाळ्यामध्ये होऊ शकत नाही. हे मला मान्य आहे. पण कधी सुरवातीला ग्राउंड असेल तर.. आणि अजून सुरुवातीला ग्राउंड असल्याचा कोणताही जीआर शासनाने काढलेला नाही. आणि महत्वाचं म्हणजे काल आणि आज गडचिरोली एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीस शिपाई चे 2 जाहिराती आले त्या मध्ये लेखी पहिल्यांदा सांगितले आहे.
मग समजा जर लेखी सुरवातीला झाली? आणि आजचा news नुसार 2 महिन्यात खरोखरच भरती निघाली. तर
फॉर्म जुलैमध्ये मध्ये निघतील. तुम्हाला माहितीच आहे फॉर्म भरला कमीत कमी एक महिना तरी मुदत असते. म्हणजे जुलै पूर्ण फॉर्म भरणा मध्ये जातो.
ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरून होईल आणि तिथून इतका पाऊस नसतोच. त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट वगैरे जनरेट व्हायला कमीत कमी 10-15 दिवस जातील..
आणि समजा जरी पाऊस जरी असला तरी लेखी कॉलेज or स्कूल मध्येच होईल. लेखी परीक्षा होईपर्यंत सप्टेंबर उजाडेल आणि लेखी ची छाननी मेरिट यामध्ये 15 दिवस कमीत कमीत जातील… त्यानंतर पावसाळा संपलेला असेल मग त्यांना ग्राउंड यायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही…
बरेच जण ह्या ब्रह्मांड आहेत की पावसाळ्यात भरती होत नाही. भरती निघुन फॉर्म भरून पेपर होईपर्यंत तुम्हाला पावसाळा निघून जाईल तर भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सरकारच्या कालावधीमध्ये एकही भरती निघाली नाही. जी भरती घेतली ती मागच्या सरकारने काढलेली होती. आणि त्यांनी 7200 पद डिक्लेअर सुद्धा केले आहे. त्यामुळे त्यांना भरती घ्यावीच लागेल.
आणि काही मुलं बोलतात की ऑक्टोबर मध्ये इलेक्शन आहेत महापालिका चे तर मला त्याचा इतका इफेक्ट होईल असं वाटत नाही…
असो शेवटी काहीही असो भरती ही निघणारच आहे. फक्त तुम्ही तुमची तयारी अभ्यास ग्राउंड सोडू नका. यावर्षी भरती होण्याची खूप दाट शक्यता आहे.
आधी लेखी की ग्राउंड या भानगडीत पडू नका मित्रांनो भरती व्हायचा असेल तर तुम्हाला दोन्ही मध्ये एक्सलंट असायला पाहिजे तेव्हा तुम्ही भरती होऊ शकाल.. सध्या पोलीस भरती मध्ये लेखी आधी होईल अशी दाट शक्यता आहे. ✅️
मी तुमच्याकडून खूप तयारी करून घेत आहे फक्त तुम्ही मला शेवट पर्यंत साथ द्या, प्रामाणिक आणि मी जे सांगतो ते करा अभ्यास करा, टेस्ट सोडवा, तुम्हाला वर्दी मी नक्की मिळवून देईल..
तुम्हाला या आर्टिकल बद्दल काय वाटतं नक्की मला टेलिग्राम वर सांगा.