मराठी स्पेशल टेस्ट ( सर्वनाम ) June 15, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( सर्वनाम )♥️ Telegram सर्वनाम हा imp टॉपिक आहे , या टॉपिक वर एक प्रश्न विचारला जातोच. म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक वाचून बरोबर उत्तर दया. All the best👍♥️ 1 / 20 खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. मी कोण हा आपण 2 / 20 'सामान्य सर्वनाम' असलेले वाक्य कोणते? हा रबरी चेंडू आहे. कोणी यावे, कोणी जावे. कोणी बक्षीस मिळवले?. कोण आहे तिकडे? 3 / 20 'आत्मवाचक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा. आपण आता खेळूया. आपण केव्हा येणार? आपण आमचा मान राखला जात. ती आपणहून आली. 4 / 20 निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते? निज आम्ही ते आपण 5 / 20 संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते? कोणी ऐकावे, कोणी बोलावे. जो करतो, तो बोलतो. कोण काय बोलणार. तो करतो व बोलतो. 6 / 20 'टेबलावरील ती माझी वही आहे' या वाक्यातील सर्वनामाचे प्रकार ओळखा. प्रश्नार्थक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम 7 / 20 पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. तू , आपण ती , हा स्वतः कोण 8 / 20 खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य आहे. धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. सावित्रीबाईंच सारं काम आटोपलं होतं. त्यांनी त्याला चांगलेच पाणी पाजले 9 / 20 मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? दोन चार तीन पाच 10 / 20 'आपण' या सर्व नावाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो, तेव्हा ते.......सर्वनाम असते. दर्शक प्रश्नार्थक स्तुती वाचक आत्मवाचक 11 / 20 सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? पाच सहा आठ नऊ 12 / 20 नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला........ असे म्हणतात. क्रियापद विशेष नाम सर्वनाम प्रतिनामे 13 / 20 सर्वनाम हे...... पदार्थाचे नाव सांगते. नामा बद्दल विशेष माहिती सांगते. नामा ऐवजी येते. क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पुरा करते. 14 / 20 एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनावाचा वापर कराल? प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुष वाचक संबंधी सर्वनाम 15 / 20 सर्वनामांना......... असे म्हणतात. प्रतीनामे क्रियाविशेषण विशेष नाम सर्वनाम 16 / 20 'आम्ही' या सर्व नावाचा प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य नामसामान्य नाम 17 / 20 पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते? मी स्वतः त्याला पाहिले. कोणी कोणास हसू नये. तो आपणहून माझ्याकडे आला. तू स्वतः मोटार हाकशील का? 18 / 20 'ज्याच्या हाती ससा तो पारधी'- यामध्ये असलेले सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत? सामान्य सर्वनाम संबंधी व दर्शक सर्वनाम पुरुषवाचक व दर्शक सर्वनाम संबंधी व सामान्य सर्वनाम 19 / 20 पर्यायी उत्तरातील 'सर्वनाम' असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते? देवा, राजनला क्षमा कर. जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. राजू आता घरी जा. उद्या सुधाकर शाळेत येणार नाही. 20 / 20 ' हा, ही, हे ' सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? संबंधी सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे दर्शक सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍♥️